नाशिक – प्रभाग क्रमांक ३० मधील बाजीरावनगर ते आर डी सर्कल आणि सिटी सेंटर मॉल सिग्नल ते गोविंदनगर हे रस्ते मॉडेल रोड म्हणून विकसित करावेत, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्त प्रशासक रमेश पवार यांना याबाबतचे निवेदन सोमवारी, १३ जून २०२२ रोजी देण्यात आले आहे.
बाजीरावनगर ते आर डी सर्कल हा रस्ता विकास आराखड्यात २४ मीटर रूंद इतका प्रस्तावित आहे. त्याची लांबी सुमारे अर्धा किलोमीटर इतकी आहे. येथे नंदिनी नदीवर पूलही प्रस्तावित आहे. हा डांबरी रस्ता सध्या सुमारे नऊ मीटरपेक्षाही कमी रूंदीचा आहे. रस्त्याच्या जागेची एकूण रूंदी पन्नास मीटर असल्याने २४ मीटरचा रस्ता होवू शकतो. उर्वरित जागेत जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक व सुशोभिकरणही करता येईल. या रस्त्यावर नंदिनी नदीवर सध्या छोटा पूल आहे. पावसाळ्यात हा पूल पुराच्या पाण्याखाली जातो, वाहतूक बंद होते, नागरिकांना धोका निर्माण होतो. हा रस्ता मॉडेल रोड म्हणून विकसित झाल्यास आर डी सर्कल, गोविंदनगर, तिडके कॉलनी, कर्मयोगीनगर, जुने सिडको, मायको सर्कल या भागातून जाणे-येणे अधिक सोयीचे होईल. नाशिककरांची गैरसोय दूर होईल. सिटी सेंटर मॉल सिग्नल ते गोविंदनगर हा ३० मीटर रूंदीचा रस्ता विकसित आहे. कडेला जॉगिंग ट्रॅकही आहे. सायकल ट्रॅकसाठी जागा आहे. रस्त्याची लांबी सुमारे अडीच किलोमीटर आहे. मोठी बाजारपेठ म्हणून हा भाग विकसित होत आहे. या दोन्ही किंवा एका रस्त्याचा मॉडेल रोड योजनेत समावेश करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
ही मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे विठ्ठलराव देवरे, मनोहर पाटील, राधाकृष्ण जाधव, सखाराम देवरे, गुलाबराव शिंदे, बापुराव पाटील, हिरालाल ठाकुर, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय डोंगरे, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, स्नेहलता सोनवणे, बाळासाहेब देशमुख, अशोक पालवे, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, मनोज वाणी, विनोद पोळ, उज्ज्वला सोनजे, सुनीता उबाळे, रूपाली मुसळे, वंदना पाटील, चित्रा रौंदळ, अपर्णा खोत, सुलोचना पांडव, मिनाक्षी पाटील, श्रीकांत नाईक, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. पराग सुपे, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. सुनिल चौधरी, चतुर नेरे, राजेंद्र कानडे, शैलेश महाजन, टी. टी. सोनवणे आदींसह रहिवाशांनी केली आहे.