नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक यांच्यात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रफग्णालय, नाशिक निःशुल्क वापरास उपलब्ध करफन देण्याबाबत सामंजस्य करार नुकताच संपन्न झाला.
नविन पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेकरीता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनाप्रमाणे आवश्यक असलेले सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रफग्णालय, नाशिक निःशुल्क वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात आले. सदर करार मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिष्ठाता, मेजर जनरल सुशिलकुमार झा आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या स्वाक्षरीने संपन्न झाला. मा. प्रत्रि-कुलगुरु डॉ. मिलींद निंकुभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी श्री. एन. व्ही. कळसकर, उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे, सहा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दुधेडीया तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षक व संशोधन संस्था आरोग्य विद्यापीठाला संलग्न असलेली भारतातील एकमेव संस्था असून जिल्हा सामान्य रुग्णालय व संस्था असलेली भारतातील एकमेव संस्था असुन जिल्हा सामान्य रुग्णालय व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेसाठी आरोग्य शिक्षण व आरोग्य सेवा दर्जेदार पध्दतीने उपलब्ध होतील. तसेच सदर संस्था भविष्यात एम्स संस्थेसाठी दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून नावारुपास येईल. कार्यक्रमास प्रास्ताविक मेडीसीन विभाग प्रमुख प्रा. डॉ. आशुतोष ओझा यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले.