नाशिक – प्रभाग ३० मध्ये गोविंदनगर, कर्मयोगीनगरसह ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश आले आहे. नागरिकांनीही महापालिकेचे आभार मानले आहे. प्रभाग क्रमांक ३० मध्ये ज्या ठिकाणी गेल्या काही वर्षात डांबरीकरण झाले नाही, तेथे डांबरीकरण करावे, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १९ मे रोजी महापालिका आयुक्त प्रशासक रमेश पवार यांच्याकडे केली होती. गोविंदनगर भागातील चौक नंबर चार, न्यू एरा शाळेजवळील महात्मा ज्योतिबा फुले चौक, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, कालिकानगर या भागात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. यावेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व परिसरातील रहिवाशी हजर होते. पावसाळ्यापूर्वी हे काम केल्याबद्दल शिवसेना, सत्कार्य फाउंडेशन, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहेत.