नाशिक – रस्त्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध यावा, कचरा टाकणार्यांवर कारवाई करता यावी, यासाठी गोविंदनगर, बडदनेगर, कर्मयोगीनगरसह प्रभाग ३० मध्ये कचर्यांच्या ब्लॅक स्पॉटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने महापालिकेकडे केली आहे. घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड यांना १३ एप्रिल २०२२ रोजी याबाबतचे निवेदन देण्यात आले.
नाशिकच्या प्रभाग ३० मधील कर्मयोगीनगर, गोविंदनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, बडदेनगर, खोडे मळा, खांडे मळा, प्रियंका पार्क, जगतापनगर, सद्गुरूनगर, काशिको पार्क, भुजबळ फार्म परिसर, बाजीरावनगर, नवीन तिडके कॉलनी, पुष्पांजलीनगर, सिटी सेंटर मॉल सिग्नल ते गोविंदनगर, बोंबले मळा परिसर या भागात ठिकठिकाणी कचर्यांचे ढिग आढळतात. अंतर्गत रस्ते, रिकामे प्लॉट येथे कचरा आढळतो. महापालिका घंटागाडी कर्मचारी वेळोवेळी कचरा उचलतात. मात्र, तरीही कचरा टाकला जातो. या भागात दुसर्या भागातील नागरिक हे कचरा आणून टाकण्याचे प्रमाणही अधिक आहे. कचरा टाकण्यावर प्रतिबंध यावा, संबंधितांवर कारवाई करता यावी, यासाठी पाहणी करून महापालिकेने कचर्याचे ब्लॅक स्पॉट निश्चित करावे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. महापालिकेला खर्च करणे शक्य नसल्यास स्मार्ट सिटीमार्फत हे कॅमेरे बसवावेत, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने करण्यात आली. १३ एप्रिल २०२२ रोजी महापालिका घनकचरा व्यवस्थापनचे संचालक आवेश पलोड यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, धवल खैरनार, संगिता देशमुख, उज्ज्वला सोनजे, सुनिता उबाळे, वंदना पाटील, मीना टकले, शीतल गवळी, ज्योत्स्ना पाटील, रूपाली मुसळे, माया पुजारी, डॉ. शशिकांत मोरे, विठ्ठलराव देवरे, गुलाब शिंदे, भालचंद्र रत्नपारखी, बाळासाहेब देशमुख, बापुराव पाटील, विनोद पोळ, दिलीप दिवाणे, डॉ. राजाराम चोपडे, श्रीकांत नाईक, दीपक दुट्टे, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, मनोज वाणी, बाळासाहेब राऊतराय, मगन तलवार, शैलेश महाजन, बन्सीलाल पाटील, पुरुषोत्तम शिरूडे, सचिन राणे, हरिष काळे, तेजस अमृतकर, आशुतोष तिडके, किरण काळे, कांचन महाजन, साधना कुवर, पल्लवी रनाळकर, सरीता पाटील, आशालता काळे, स्मिता गाढवे, संगिता डामरे, प्रथमेश पाटील आदींसह रहिवाशांनी ही मागणी केली आहे.