नाशिक: आजच्या यांत्रिक व तांत्रिक युगात मुलींचे जीवन खूपच विचलित होऊन बसले आहे तर प्रत्येक कुटुंब आपल्या मुलींचे जीवनाविषयी चिंतित आहे. हे सर्व लक्षात घेऊनच नाशिक जिल्हा माहेश्वरी महिला मंडळ तथा सिडको महिला मंडळ नाशिक यांनी भारतीय जैन संघटना पुणे संचलित स्मार्ट गर्ल – टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉंग ही दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत स्वतःची ओळख, संवाद, नाती, मैत्री व प्रलोभन, निवड आणि निर्णय तथा स्वाभिमान व स्वरक्षा आदी जीवनातील रोजच्या विषयांवर ऑडियो व्हिडियो, ऍक्टिव्हिटीज व चर्चा यातून आपले जीवन आनंदाने व सक्षमपणे कसे जगता येईल याचा मुलींमध्ये विश्वास निर्माण होईल. भाग घेणाऱ्या मुलींच्या पालकांशी पण हितगुज होईल. ही कार्यशाळा बीजेएस पुणे यांनी अथक वैज्ञानिक व मानसिक संशोधन तज्ञाच्या मार्गदर्शनाने तयार केली आहे. तरी सर्व समाजातील १२ ते २२ वर्षीय अविवाहित मुलींनी ह्या कार्यशाळेचा फायदा घेऊन आपले जीवन आनंदी बनविण्यास समर्थ व्हावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
कार्यशाळा ता २८ व २९ मे रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत महेश भवन सिडको, नाशिक येथे आयोजित केली असून रजिस्ट्रेशन शुल्क फक्त रु ५०० आहे.
संपर्कासाठी
सौ नीता डागा-9011167607
सौ कल्पना नावदंर-9403403431
सौ नयना हेडा-8275022005
सौ वैशाली मर्दा-8275873540
राजेंद्र भुतडा-9921386768
सौ नीशा लढ्ढा -9850632273
यांचेशी नाशिक जिल्ह्यातील सर्व समाजजाच्या मुलींनी सम्पर्क साधावा।असे आवाहन नाशिक जिल्हा माहेश्वरी महिला मंडळ च्या अध्यक्षा सौ नीता डागा यांनी केले आहे.