शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

५० वर्षांनी भेटले पेठे विद्यालयातील सवंगडी; शाळेला दिली ही अनोखी गुरुदक्षिणा

by Gautam Sancheti
मे 19, 2022 | 11:19 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220519 WA0013

 

नाशिक : स्वकर्तृत्वाच्या बळावर समाजातील विविध क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे पेठे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी वयाच्या सत्तरीतही वर्गातील मैत्री बळकट केली. सत्तरीतसुद्धा मित्रांना जोडून पुन्हा शालेय जीवनाचा आनंद लुटला हा उपक्रम तरुणाईला नवी दिशा देणारा आहे, असे गौरवोदगार नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष दिलीप फडके यांनी काढले.

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त पेठे विद्यालयाच्या १९६९-७० बॅचच्या इयत्ता ११ वी (मॅट्रिक) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पेठे विद्यालयात नुकताच मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. शाळा सोडून तब्बल ५० वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अजूनही तेव्हाचे विद्यार्थी व आजचे जेष्ठ नागरिक जेव्हा शाळेत एकत्र आले तेव्हा स्मृती पटलावर कोरल्या गेलेल्या शालेय आठवणी, चेष्टा मस्करी, खोड्या, खेळ आणि त्याचबरोबर शिक्षकांबद्दलच्या जिव्हाळ्याच्या आठवणी यामुळे सर्वच भावूक झाले होते. आपल्या शालेय आठवणींमध्ये सर्वच मित्र हरखून गेले होते. पाचवी ते अकरावी या ७ वर्षांत अनुभवलेली शाळा, मिळालेले ज्ञान, संस्कार, शाळेत केलेली धमाल यात सर्व सवंगडी अक्षरशः दंग झाले होते.

प्रारंभी विद्यार्थ्यांचे आगमन होताच शाळेने दिलेल्या अल्पोपहरामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. नंतर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी फेर फटका मारला. यावेळी शाळेतील जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सर्वजण वर्गात आपल्या जागांवर जाऊन बसताच आठवणींना उमाळा आला. सतिश जोशी यांनी शाळेची घंटा वाजवून वातावरण निर्मिती केली. शाळेचा फेरफटका आणि काळानुरूप शाळेचे बदललेले रुपडे पाहून सर्वजण सुखावले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात अनिल सुकेणकर यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक करून १९७० च्या मित्रांच्या ग्रुपची आत्तापर्यंतची वाटचाल सांगितली.

कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन वसंत देव, घोडके व करंदीकर यांच्या हस्ते झाले. तर सरस्वती पूजन लक्ष्मीकांत जोशी, प्रकाश गुजराथी, अरुण गाडगीळ, राजू क्षीरसागर आणि संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेची ‘या कुन्देन्दु तुषार हार धवला…’ ही लहानपणापासून पाठ असलेली शाळेची प्रार्थना मोठ्या आवाजात एका सुरात म्हटली. विशेष म्हणजे जागेवरच उभे राहून सर्वांनी पिटीचा व्यायामही केला. यासाठी मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण अडावदकर यांनी केले.

मॉनिटर तुषार इनामदार यांनी रोल कॉल घेतला, त्याचवेळी राजू क्षीरसागर यांनी त्या त्या विद्यार्थ्याची उपस्थितांना थोडक्यात ओळख करून दिली. नोकरी व्यवसायामुळे बाहेरगावी आणि परदेशी असलेले ५० वर्षांनीच एकमेकांना बघत होते. उपस्थित असलेल्यां विद्यार्थ्यांपैकी डॉ. कैलास कमोद, गुलाम शेख आणि माधव गोखले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, शाळा, गुरुजन यांविषयी कृतज्ञता आणि आदरभाव व्यक्त केला. आयुष्यात यशस्वी होण्यात शाळेचा असलेला सिंहाचा वाटा प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवत होता. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणाऱ्या पुस्तिकेचे अनावर कैलास पाटील, चंद्रशेखर वाड, दिलीप फडके, रमेश बापट, सुरेश पाटील, मांडवगणे, सतिश वाघ, अनिल तुपे, अडावदकर, देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

शाळेतर्फे मनोगत व्यक्त करतांना मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी शाळेच्या वाटचालीची माहिती दिली. यावेळी रमेश बापट, सतीश महाजन, पाराशरे, विसपुते आणि सूर्यवंशी यांच्या हस्ते संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेच्या शिक्षकवृंदांचा सत्कार केला. शाळेच्या प्रेमापोटी विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा स्वरुपात संस्थेस २ लाख ९ हजार रुपयांचा धनादेश किशोर पवार, माधव गोखले, मंगेश कुलकर्णी यांच्या हस्ते शाळेस सुपूर्त केला. या स्नेहमेळाव्यास ५२ विद्यार्थी उपस्थित होते. सतीश कचोळे यांनी गुरुजनांचे आभार मानले. असा स्नेहमेळा पुन्हा घडवून आणण्यासाठी भेटण्याचे अभिवचन देऊन ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी शाळेचा निरोप घेतला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निफाड तालुक्यात अल्पवयीन मुलीला धमकी देत बलात्कार; दोघा आरोपींना पोलिसांनी केली अटक

Next Post

नाशकात गुन्हेगारी वाढली; म्हसरुळला तरुणाची हत्या, मित्राने केला पोबारा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशकात गुन्हेगारी वाढली; म्हसरुळला तरुणाची हत्या, मित्राने केला पोबारा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011