नाशिक – कर्मयोगीनगर, बाजीरावनगर परिसरात गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, तो त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. बाजीरावनगर, पुष्पांजलीनगर, नवीन तिडके कॉलनी, कर्मयोगीनगर, प्रियंका पार्क, तिडकेनगर या भागात ठिकठिकाणी गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कमी दाबाने, तर कधी काही ठिकाणी पाणीच न येणे, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या भागातील संबंधित अधिकारी, व्हॉल्वमन यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांना गुरुवारी, ५ मे रोजी निवेदन देण्यात आले. हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, दिलीप दिवाणे, संजय टकले, श्रीकांत नाईक, यशवंत जाधव, निलेश ठाकूर, मनोज वाणी, अशोक पाटील, बापुराव पाटील, आशिष वरखेडे, प्रदीप गोराणे, नवलनाथ तांबे, बाळासाहेब राऊतराय, उज्ज्वला सोनजे, मीना टकले, वंदना पाटील, प्रतिभा पाटील, डॉ. शशिकांत मोरे, दीपक दुट्टे, बन्सीलाल पाटील, तेजस अमृतकर, प्रथमेश पाटील आदींनी केली आहे. याबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे धारणकर यांनी सांगितले.