नाशिक मधील तरुण कलाकारांच्या ‘म्यूझोमिन्ट’ तर्फे ३० एप्रिल रोजी ‘नमन नटवरा’ या नाट्यसंगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमधील प्रसिद्ध गायक आशिष रानडेंच्या सुमधुर गायकीचा आस्वाद घेण्याची संधी नाशिककरांना या निमित्ताने मिळणार आहे. या मैफिलीत मुंबई येथील तरुण तबला वादक तनय रेगे आणि नाशिकचे युवा संवादिनी वादक समृद्ध वावीकर साथ करतील. पखवाज साथ दिगंबर सोनवणे आणि मैफिलीचे निवेदन रेडिओ विश्वासच्या बागेश्री पारनेरकर करतील. ३० एप्रिल शनिवार रोजी सायंकाळी ६ वाजता गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास सभागृहात ही मैफिल रंगणार आहे. महाराष्ट्रातील समृद्ध नाट्यसंगीत परंपरेची अनुभूती घेण्यासाठी जास्तीतजास्त संख्येने रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ‘म्यूझोमिन्ट’ द्वारे करण्यात येत आहे.