नाशिक – नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून २७ ते ३० एप्रिल दरम्यान राष्ट्रीय जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा नाशिकरोड येथील महाराष्ट्र एव्हायर्मेंट एंजिरींग ट्रेनिंग अँड रिसर्च अकेडमी आय एस पी कॉलनी , विभागीय आयुक्तालयाजवळ होणार बुद्धिबळाच्या जलद आणि अति जलद स्वरूपात या स्पर्धा खेळवण्यात येणार आहे आहेत. राष्ट्रीय जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आयोजनाचा मान नाशिक जिल्ह्यास प्रथमच लाभत आहे.दि. नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना ही महाराष्ट्र चेस असोसिएशनशी व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या अखिल बुद्धीबळ महासंघाशी संलग्न आहे. सदर स्पर्धेस महाराष्ट्र चेस असोसिएशन व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाची अधिकृत मान्यता तसेच सदर स्पर्धेस संपूर्ण सहकार्य असणार आहे.
राष्ट्रीय जलद व अति जलद बुद्धिबळ निवड स्पर्धेसाठी ३० पेक्षा अधिक राज्यातून ५०० ते ७५० खेळाडू अपेक्षित आहेत. सर्व खेळाडूंची राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था जिल्हा संघटना मोफत करून देत आहे. महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर अर्जुन पुरस्कार प्राप्त व भारतीय टीमचे प्रशिक्षक प्रविण ठिपसे, पदमश्री व महिला इंटरनॅशनल मास्टर भाग्यश्री ठिपसे, ग्रँडमास्टर दिव्या देशमुख , या मराठमोळ्या बुद्धिबळपटूंसह ग्रँडमास्टर अर्जुन कल्याण, अरविंद चिदंबरम, निलोपतल दास, गोपाल नारायण , मित्रभ गुहा तसेच इंटरनॅशनल मास्टर प्रणव आनंद, फिडे मास्टर आराध्य गर्ग, निरंजन नवलगुडे आदींचा खेळ बघण्याची तसेच त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी नाशिककरांना या निमित्याने मिळणार आहे या स्पर्धेत सहभाग पक्का केलेल्या दिव्या देशमुख यांनी काही महिन्यापूर्वीच भुवनेश्वर येथे झालेली महिला राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. अश्या दर्जेदार खेळाडूंचा बुद्धिबळ डावांचा आनंद घेण्यासाठी भारतभरातील तमाम बुद्धिबळ प्रेमी या बुद्धिबळ सोहळ्यानिमित्त्याने स्पर्धेस भेट देतील. या राष्ट्रीय जलद व अतिजलद निवड बुद्धिबळ स्पर्धेतून निवडलेले खेळाडू जागतिक जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करतील. सदर स्पर्धेचे थेट प्रक्षेपण विविध डिजिटल माध्यमांतून केले जाईल. या स्पर्धेत २७ , २८ , २९ एप्रिल या तीन दिवशी मिळून जलद बुद्धीबळ स्पर्धेचे एकूण ९ सामने खेळण्यात येणार आहे तर ३० एप्रिल या दिवशी अति जलद या बुद्धिबळाच्या प्रकारातील ११ डाव खेळवण्यात येणार आहेत. नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण ६ लाख ५० हजारांचे बक्षिसे देण्यात येणार आहेत.
नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना सतत खेळाडूंना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यशील राहिली आहे. मागील ४ वर्षांत संघटनेने ८० पेक्षा जास्त ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्पर्धा घेतल्या. सन २०१८ मध्ये जागतिक बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष नायजेल शोर्ट यांनी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेला भेट देऊन संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. सन २०१९ मध्ये संघटनेने दृष्टीबाधित व्यक्तींसाठीची पश्चिम विभागीय आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली. नुकतेच फेब्रुवारी २०२२ मध्ये राज्यस्तरीय जलद व अति जलद बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजनही संघटनेने केले होते.
या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे ही राष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱ्या नवोदित बिगरमानांकित बुद्धिबळ प्रेमींना अशा स्पर्धेत जलद व अतिजलद आंतरराष्ट्रीय मानांकन मिळण्याची संधी देखील प्राप्त होते. सदर राष्ट्रीय स्पर्धेत १०वी व १२वी ला सहभागाचे १५ गुण वर विजेता असल्यास २० गुण प्राप्त होतात तसेच पुढील वाटचालीत नक्कीच हि राष्ट्रीय स्पर्धा मोठी भूमिका बजावेल म्हणुन नाशिककरांनी स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे व सचिव सुनील शर्मा व्यक्त केली आहे. अधिक माहितीसाठी जयराम सोनवणे- ९८६०१३६००२, भुषण पवार – ७८४१९२४८४१, जयेश भंडारी- ७८७५८८८८३४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून करण्यात येत आहे. सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र सोनवणे, जयराम सोनवणे, विनायक वाडिले, विक्रम मावळंकर, गौरव देशपांडे, भुषण ठाकूर, अजिंक्य तरटे, मंगेश गंभीरे, सचिन निरंतर, माधव चव्हाण आदी विशेष परिश्रम घेत आहेत.