नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोटमगाव जवळील एकलहरे वीज निर्मिती केंद्राच्या हद्दीत राखीव शेत्रातील दाट झाडींत शुक्रवारी सकाळी एक वयस्कर बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वय झाल्याने आणि शिकार करणे अशक्य झाल्याने अन्नपाण्याअभावी या बिबट्याचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. वनपरिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वन रक्षक गोविंद पंढरे, विजयसिंग पाटील आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून मृत बिबट्या ताब्यात घेतला. या मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत दिसून आले. या बिबट्याचा मृतदेह वन विभागाच्या पथकाने नाशिकमधील पशु वैद्यकीय रुग्णालयात दाखल केल्यावर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली थोरात यांनी या बिबट्याच्या मृतदेहाचे शवविश्चेदन केले. त्यानंतर वनपरिक्षेत्रअधिकारी विवेक भदाणे यांच्या उपस्थितीत या बिबट्याच्या मृतदेहावर रीतसर गंगापूर रोपवाटिका येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.