न्यूरोलॉजिस्ट डॉ. विशाल सावळे पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमने केले यशस्वी उपचार
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : ३८ वर्षीय महिला रुग्णाला अर्धांगवायूच्या दुर्मिळ झटक्यातून बरे होण्यास येथील न्यूरोलॉजिस्ट डॉ. विशाल सावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वोक्हार्ट हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी उपचार केले आहेत. त्यामुळेच या महिलेची प्रकृती आता उत्तम आहे. मोठ्या धोक्यातून ती सावरली आहे.
उपचार करण्यात आलेल्या ३८ वर्षीय महिलेला वोक्हार्ट हॉस्पिटल, नाशिक येथे इमरजेंसी डिपार्टमेंटमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांना डाव्या बाजूला अर्धांगवायू (पॅरेलिसेस), शब्द उच्चारण्यात अडचण (बोबडी वळलेली) आणि बोलणे अस्पष्ट झाले होते. सदर महिलेला कोणतेही कामयमस्वरुपीचे आजार म्हणजे डायबेटिस, ब्लड प्रेशर, थायरॅाइड किंवा हृदयाची समस्या नव्हती. तिला अचानक पॅरालिसेसचा झटका आल्याने नातेवार्इंकांनी त्वरित रुग्णालयाशी संपर्क साधला आणि लक्षणे दिसू लागल्यानंतर एका तासाच्या आत महिला रुग्णालयात दाखल झाली. त्यानंतर रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अर्धांगवायू शिवाय उलट्या होणे, फिट येणे किंवा डोकेदुखीचा कोणताही त्रास नसल्याचे लक्षात आले. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये कोणताही स्ट्रोक असलेला रुग्ण दाखल झाल्यानंतर कोड व्हाइट सक्रिय करण्यात येतो. कोड व्हाइट हा रुग्णालयाचा स्ट्रोकसाठी (पॅरालिसेस) आपत्कालीन कोड आहे. तो लागू केल्यानंतर स्ट्रोक टिमला सतर्क करण्यात येते आणि स्ट्रोक थ्रोम्बोलायसिस करणारी टीम पाच मिनिटांच्या आत इमरजेंसी डिपार्टमेंटमध्ये पोहोचते आणि शक्य तितक्या लवकर निदानासाठी लागणाऱ्या इमरजेंसी चाचण्या करण्यात येतात. एमआरआय चाही त्यात समावेश आहे. स्ट्रोक टीममध्ये हेड ऑफ न्यूरोलॉजी डिपोर्टमेमेट – डॉ. विशाल सावळे पाटील (एमडी मेडिसिन आणि एमडी न्यूरोलॉजी) यांच्यासह क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट, रेडिओलॉजिस्ट, थ्रोम्बोलायसिसमध्ये प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि फार्मासिस्टचा समावेश असतो. सर्व टिम दाखल झाल्यानंतर मेंदूचा एमआरआय आणि एमआर अँजिओग्राफीनंतर पेशंटच्या मुख्य रक्तवाहिनीत मोठा ब्लॉक (थ्रोम्बस-एमसीए ब्लॅाक) असल्याचे आढळले. त्यामुळे रुग्णाला ब्रिजींग थ्रोम्बोलायसिस (थ्रोम्बोलायसिस म्हणजे गुठळ्या विरघळून रक्त प्रवाह सुधारणे आणि मेंदूचे नुकसान टाळणे व झालेला पॅरेलिसेस परत नॉर्मल करणे) करण्याचे ठरते. थ्रोम्बोलायसिस पेशंटला इंजेक्शन अल्टेप्लेस (0.9mg/Kg शरीराचे वजन) नावाच्या औषदाद्वारे थ्रोम्बोलायसिस केले गेले. त्यानंतर दर १५ मिनिटांनी रुग्णाचे शारीरिक मूल्यांकन केले जाते. थ्रोम्बोलायसिसनंतर डॉक्टरांनी चमत्कारिक सुधारणा पाहिल्या. त्यात डाव्या बाजूचा अर्धांगवायू सामान्य पातळीवर आला होता आणि झालेला पॅरालिसेस पूर्णपणे बरा झाला होता. चेहऱ्याचा पॅरालिसेस देखील बरा झाला आणि बोलणे देखील सामान्य झाले होते.
४५ मिनिटांनंतर चेकअपच्या वेळी रुग्ण पूर्णपणे बरा झाला होता. त्याला कोणतीही न्यूरोलॉजिकल कमतरता निदर्शनात आली नाही. रुग्ण पूर्णपणे पॅरालिसेस नसल्यासारखा झाला होता. क्लिनिकल सुधारणेसह रेडिओलॉजिकल सुधारणेची खात्री करण्यासाठी थ्रोम्बोलायसिसच्या एका तासानंतर पुन्हा मेंदूचा एमआरआय आणि अँजिओग्राफी करण्यात आली. या स्कॅनमध्ये जो एमसीएमध्ये ब्लॉक होता तो पूर्णपणे नाहीसा झाला होता आणि सर्व रक्त गुठळ्या (थ्रोम्बस) विरघळल्या होत्या. कोणत्याही सर्जिकल हस्तक्षेपाशिवाय रुग्ण पूर्णपणे बरा झाला. डॉ. सावळे यांनी या प्रकरणाचा तपास केला, कारण महिलेमधील तीव्र स्ट्रोकचे कारण अद्याप अज्ञात होते. पुढील तपासणीनंतर आश्चर्य वाटणारी एक बाब समोर आली. महिलेच्या मानेत अतिरिक्त बरगडी (सर्वायकल रीब) असल्याचे आढळले. या अतिरिक्त बरगडीमुळे महिलेच्या रक्तवाहिन्या ब्लाॅक झाल्या होत्या. सततच्या दबावामुळे रक्त वाहिनीत मोठी गाठ (थ्रोम्बस) तयार झाली होती. त्यामुळे उजव्या बाजूच्या रक्तवाहिन्या रक्त पुरविणारी महत्त्वाची रक्तवाहिनी ब्लॉक झाली होती. ही रक्ताची काठ काहीवेळा रक्त प्रवाहाबरोबर इतरत्र बाहेर पडू शकते आणि एम्बोलाय (रक्ताची गुठळी) बनते. ही गुठळी मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांना ब्लॉक करू शकता. त्याला ब्रेन स्ट्रोक म्हणून ओळखले जाते.
या पेशंटमध्ये हा एम्बोलाय (एमसीए) मध्ये आढळला. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला व ब्रेन स्ट्रोक समोर आला.
या रुग्णाला यशस्वीरीत्या थ्रोम्बोलायसिस करण्यात आले आणि तो पूर्णपणे बरा झाला आहे. नंतर अतिरिक्त बरगडी कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जरीने यशस्वीरीत्या काढण्यात आली. तसेच रुग्णाला दुसऱ्या स्ट्रोकची शक्यता कमी करण्यासाठी रक्त पातळ करणारे औषधे (अँटीकोआगुलंट्स) सुरू केले. स्ट्रोकचे कारण दुर्मिळ होते, परंतु आजकाल तरुणांमध्ये स्ट्रोक अधिक प्रमाणात आढळून येत आहे. बदललेली जीवनशैली, व्यसने जसे की स्मोकिंग, दारू पिणे यासह कमी वयात ब्लड प्रेशर आणि डायबिटीस असे अनेक याची कारणे असू शकतात. महिलेला लक्षणे दिसू लागल्यानंतर एक तासाच्या आत रुग्णालयात आणल्यामुळे रुग्णाचा जीव वाचला आणि पॅरेलिसेस टळला. त्यामुळे कोणताही स्ट्रोक असलेल्या रुग्णाला साडेचार तासांत रुग्णालयांत आणले व त्यावर योग्य उपचार झाले तर त्यांचा पॅरेलिसेस पूर्णपणे बरा करता येवू शकतो.