नाशिक – समस्त वीरशैव लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना ८ मार्च २०२२ रोजी शिवा सिद्धेश्वर महादेव मंदिर , बजाजनगर जिल्हा औरंगाबाद मध्ये घडली. ही घटना लोकशाही देशात अतिशय संतापजनक व मानवतेला काळीमा लावणारी असून संबंधित गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक अटक करून त्याला मोका कायद्या अंतर्गत कडक कारवाई करून हद्दपारकरण्याची मागणी वीरशैव लिंगायत समाज आणि महात्मा बसवेश्वर प्रेमींच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी या घटनेचा निषेधही करण्यात आला.
हे निवेदत देतांना अरुण लद्दे (राज्य उपाध्यक्ष, शिवा कर्मचारी महासंघ महाराष्ट्र), सुनील वाडकर (राज्य उपाध्यक्ष शिवा संघटना महाराष्ट्र), अनिल कोठूले (उत्तर महाराष्ट्र प्रमुख शिवा संघटना), विलास हुकीरे (जिल्हाप्रमुख, शिवा कर्मचारी महासंघ नशिक), विलास कारेगांवकर (उप जिल्हाप्रमुख, शिवा संघटना नाशिक), अशोक वारिकर(जिल्हा कार्ये अध्यक्ष नाशिक), उदय हिंगमिरे (जेलरोड प्रमुख शिवा संघटना), शशिकांत कोठूले अॅड़ बाळासाहेब वाणी, विलास स्वामी, प्रभाकर कबाड़े, गिरिजा शंकर लोहारकर, अनिल रुद्रे, महेश बागले, प्रवीण हिंगमिरे, संतोष प्रमाणे, कैलास कोठूले, अमित भोरे, महेश महांकाले, प्रवीण जंगम, बालू जंगम, शेखर भायभांग, हिंगमिरे, प्रभाकर रंगनाथ व इतर समाज बांधव हजर होते.