नाशिक – नाशिकच्या प्रभाग क्रमांक २४ आणि २५ मधील नागरिकांच्या सोयीसाठी तिडकेनगर व जगतापनगर येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे. यासंदर्भातील निवेदन महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकार्यांना देण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक २४ आणि २५ मधील पाटीलनगर, सिडको, जगतापनगर, कालिका पार्क, कालिका नगर, तिडकेनगर, प्रियंका पार्क, उंटवाडी, कर्मयोगीनगर या भागात लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या परिसरासाठी तिडकेनगर, कर्मयोगीनगर येथील महापालिकेच्या संभाजी व्यायामशाळेच्या इमारतीत, तिडकेनगर येथील रविराज हट्सजवळील महापालिकेच्या सभागृहात किंवा जगतापनगर येथील महापालिकेच्या स्वर्गीय बाबासाहेब गाढवे सभागृह यापैकी एक किंवा दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे, नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रासाठी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशन आणि परिसरातील रहिवाशी यांचे प्रशासनाला हवे ते सहकार्य मिळेल, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
दै. ‘सामना’चे पत्रकार, सत्कार्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), कर्मयोगीनगर, तिडकेनगर शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, उंटवाडी, जगतापनगर शिवसेना शाखाप्रमुख मयुर आहेर, शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख), धवलताई खैरनार, उज्ज्वलाताई सोनजे, रवींद्र सोनजे, श्रीकांत नाईक, प्रभाकर खैरनार, अशोक पाटील, प्रथमेश पाटील, संकेत गायकवाड (देशमुख), राहुल काळे, राहुल पाटील, डॉ. शशीकांत मोरे, निलेश ठाकूर, मयुर ढोमणे, शैलेश महाजन, बापू आहेर, दिग्विजय पवार, मनोज वाणी, मकरंद पुरेकर, आबा महाले, मनोज दुसाने, विजय शिरोडे, परेश येवले, सचिन जाधव, आर. ओ. पाटील, मयुर सोनजे, कैलास भिंगारकर, वैभव कुलकर्णी, यशवंत जाधव आदींसह शिवसैनिक व रहिवाशांनी ही मागणी केली आहे.