नाशिक – शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या वतीने कर्मयोगीनगर, तिडकेनगर येथील औदुंबर वाटिका उद्यानात बुधवारी, २३ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही अभूतपूर्व प्रतिसाद देत येथे भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री गजानन महाराजांचा जयघोष, श्री विजय ग्रंथ पारायण, आरतीसह धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.
गेल्या दहा वर्षांपासून औदुंबर वाटिका उद्यानात श्री गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. येथे बुधवारी महिलांनी श्री गजानन विजय ग्रंथाचे मनोभावे पारायण केले. आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. दर्शनानंतर पिठलं, भाकरी, ठेचा, बुंदी या महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला. या सोहळ्याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, सुभाष गायधनी, नाना पाटील, जगन आगळे, चित्रा रौंदळ, अपर्णा खोत आदींसह गोविंदनगर येथील संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, गुलाबराव शिंदे, राधाकृष्ण जाधव, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे भालचंद्र रत्नपारखी, अशोक पालवे, बाळासाहेब देशमुख, सर्वस्तरातील प्रतिष्ठित, विविध मंडळे, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. जुने सिडको, नवीन सिडको, गोविंदनगर, सद्गुरूनगर, मधुबन कॉलनी, सुंदरबन कॉलनी, सदाशिवनगर, बाजीरावनगर, तिडकेनगर, कर्मयोगीनगर, उंटवाडी, कालिका पार्क, जगतापनगर, खोडे मळा, खांडे मळा, बडदेनगर आदी सर्वच भागातून भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
सोहळा यशस्वीतेसाठी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, संजय टकले, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. सुनील चौधरी, बाळासाहेब दिंडे, राजेंद्र कानडे, मोहन पाटील, मनोज पाटील, यशवंत जाधव, प्रल्हाद भामरे, नीलेश ठाकूर, मंदार सडेकर, अशोक पाटील, शैलेश महाजन, किरण काळे, मनोज वाणी, विनोद पोळ, दिलीप दिवाणे, श्रीकांत नाईक, हरिष काळे, दीपक दुट्टे, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, सुनीता उबाळे, उज्ज्वला सोनजे, शीतल गवळी, मीना टकले, रेखा देशमुख, दीपाली सोनजे, संध्या बोराडे, ज्योत्स्ना पाटील, माया पुजारी, रूपाली मुसळे, आशुतोष तिडके, नितीन तिडके, बाळासाहेब राऊतराय, वैभव कुलकर्णी, दिलीप देशमुख, मगन तलवार, पुरुषोत्तम शिरोडे, संकेत गायकवाड (देशमुख), प्रथमेश पाटील, कुणाल महाजन, बन्सीलाल पाटील, सचिन राणे, गणेश पाटील, तुषार मोरे, भूषण देशमुख, मनोज दुसाने, योगेश सिसोदिया, संग्राम देशमुख यांच्यासह पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.