शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश
नाशिक – कालिका पार्क येथे घरांवर लोंबकळणार्या धोकादायक विद्युततारा भूमिगत करण्याच्या कामाला बुधवारी, ९ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश आले असून, रहिवाशांनी या कामाचे स्वागत केले आहे. जगतापनगर, प्रियंका पार्क, कालिका पार्कसह परिसरातील घरांवर लोंबकळणार्या विद्युततारा भूमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती. याची दखल घेत १३ ऑक्टोबर २०२१ रोजी या भागात महावितरण आणि महापालिका विद्युत विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी पाहणी केली, या कामाचा प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासन दिले होते. सततच्या पाठपुराव्यानंतर बुधवारी, ९ फेब्रुवारी २०२२ रोजी कालिका पार्कमधील घरांवरील तारा भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात झाली. वीस वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, दिलीप दिवाने, बाळासाहेब दिंडे, राजेंद्र कारभारी, सुनील तलवारे, सोमनाथ काळे, चंपालाल गोठी, बाळासाहेब दिघे, बाळू जाधव, बाळासाहेब दुसाने, डॉ. प्रशांत वाणी, डॉ. शशीकांत मोरे, मनोज वाणी, नीलेश ठाकूर, चिंधु चौधरी, मीना टकले, उज्ज्वला सोनजे, वंदना पाटील, प्रतिभा पाटील, सारीका कासार, चंद्रकला वाघ, शोभा चौधरी, वृषाली ठाकरे, शीतल गवळी, धनश्री तलवारे, सुलोचना पांडव, सुनीता ठाकरे, जयश्री राठोड, परीघा जाधव, लता काळे, स्मिता गाढवे, चंद्रकला ठाकरे, ज्योती सोनजे, शैला देशमुख, छाया चौधरी, विमल होरे आदींसह रहिवाशांनी काम सुरु केल्याबद्दल महापालिका व महावितरणचे, तर पाठपुराव्याबद्दल शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे आभार मानले आहे.