नाशिक – नाशिक गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आगमन झाले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते. शासकीय विश्रामगृहात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आगमन झाल्यावर त्यांना शहर पोलीस दलाच्यावतीने सलामी देण्यात आली.
राज्यपाल यांचे मुंबईकडे प्रयाण
यानंतर नाशिक शासकीय विश्रामगृह येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अल्प विश्रांतीनंतर मुंबईकडे प्रयाण केले आहे.