नाशिक – गोविंदनगर, सद्गुरूनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या संध्या छाया विरंगुळा केंद्रात महापालिकेकडून विद्युत पोल व दिशादर्शक फलक उभारण्यात आला. यासाठी प्रयत्न केल्याबद्दल संघाने शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक २४ मध्ये गोविंदनगरच्या सद्गुरूनगर येथे संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्र आहे. तेथील आवारात विद्युत पोल बसवावा, दिशादर्शक फलक लावावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे यांच्यासह पदाधिकार्यांनी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्याकडे केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्याने महापालिकेने विद्युत पोल बसविला, यामुळे आवारात लख्ख प्रकाश पडत आहे. सदाशिवनगरच्या कमाणीजवळ सद्गुरूनगरकडे जाणार्या चौकात विरंगुळा केंद्राचा फलकही बसविण्यात आला. यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, उपाध्यक्ष शोभाताई सावकार, सचिव मनोहर पाटील, सहसचिव राधाकृष्ण जाधव, कोषाध्यक्ष सखाराम देवरे, सदस्य चिंतामण सावकार, गुलाबराव शिंदे, बापुराव पाटील, हिरालाल ठाकुर, सुजाता येवलेकर, दिलीप खोडके यांनी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे आभार मानले. फलक व विद्युत पोलजवळ फोटो काढून आनंद व्यक्त केला, संघाचे सर्व ज्येष्ठ सदैव पाठीशी राहतील, अशी ग्वाही दिली. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, वंदना पाटील, प्रतिभा पाटील, संग्राम देशमुख आदी हजर होते.