नाशिक – मेट इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथील सौरभ सोहानी आणि देवश्री वैष्णव या एमबीएच्या दोन विद्यार्थ्यांची Intellipaat Software Solutions Pvt. Ltd. या बेंगलोर येथील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये ‘बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट’ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याकरिता कंपनीने त्यांना ‘प्रत्येकी नऊ लाख रुपये वार्षिक पॅकेज’ दिले आहे. सध्याच्या कोरोना सदृश्य परिस्थिती असताना देखील विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीची चमक दाखवत हे यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मेट -एमबीए संस्थेने प्लेसमेंट चा आपला डंका कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे मुंबई पुणे याव्यतिरिक्त बेंगलोर येथून सुद्धा अनेक कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट द्वारा आकर्षक पॅकेजेस देऊन कौशल्यवान, तंत्रस्नेही विद्यार्थ्यांना जॉबची संधी उपलब्ध करून दिली आहे. Intellipaat Software Solutions Pvt. Ltd. ही कंपनी आपल्या अत्याधुनिक सॉफ्टवेअर द्वारे देशातील तसेच परदेशातील आणि विद्यार्थी, शिक्षण संस्था, विद्यापीठे यांना विविध क्षेत्रातील विषयांचे प्रशिक्षण देण्यात अग्रेसर आहे. यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, क्लाऊड कम्प्युटिंग, बिग डेटा यासारखे अनेक कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध करून देते व त्याद्वारे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविण्याचा कंपनीचा मानस आहे. कार्पोरेट जगतातील अनेक अग्रेसर कंपन्याना आपले मनुष्यबळ अद्ययावत ठेवण्यासाठी असे कोर्सेस फायदेशीर असतात.
सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये माहिती व तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडत आहेत. याचाच वेध घेऊन विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन, संभाषण कला, नेतृत्व क्षमता यांचा अंगीकार करत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतले पाहिजे. मेट-एमबीए या संस्थेकडून सातत्याने आपल्या विद्यार्थ्यांना उद्योग जगतातील नवनवीन प्रवाह, आव्हाने, तसेच संधी जाणून घेण्याकरता अनेकदा तज्ञांची व्याख्याने, सेमिनार, चर्चासत्रे घेतले जातात. विद्यार्थ्यांना कार्पोरेट जगताचा अंदाज घेऊन त्याकरता तयार करता येते आणि आपल्या ड्रीम जॉब मिळवता येतात हे यातून सिद्ध होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, संचालक डॉक्टर निलेश बेरड प्राध्यापक वृंद आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.