‘शिवसेना, सत्कार्य’चे आयुक्तांना निवेदन
नाशिक – उंटवाडीतील कालिका पार्क, कर्मयोगीनगरमध्ये नुकताच नैसर्गिक नाला बुजविण्यात आला आहे. पावसाळ्यात यामुळे घरांमध्ये पाणी जाईल, नागरिकांना याचा मोठा त्रास होईल, हे टाळण्यासाठी हा नाला पूर्ववत करावा, संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. बडदेनगर ते पाटीलनगर या नवीन रस्त्याला जोडणार्या कर्मयोगीनगर, कालिका पार्ककडून जाणार्या रस्त्यालगतचा नाला गेल्या काही दिवसांपासून बुजविला जात आहे. आठ-दहा दिवसांपासून हा नाला पूर्णपणे बुजविला गेला आहे. बांध टाकून पाणी पुढे वळविण्यात आले आहे. पावसाळ्यात परिसरातील घरे व हौसिंग सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी जाईल, परिसर जलमय होवून वाहतूकही बंद होण्याची भीती आहे. नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी हा नाला पूर्ववत करण्यात यावा, याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना गुरुवारी, २३ डिसेंबर २०२१ रोजी देण्यात आले आहे. नाला पूर्ववत करण्याचे काम त्वरित सुरू करावे, संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, यशवंत जाधव, नीलेश ठाकूर, संजय टकले, अशोक पाटील, श्रीकांत नाईक, मगन तलवार, मनोज वाणी, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. आर. ओ. पाटील, विजय कांडेकर, वंदना पाटील, उज्ज्वला सोनजे, मीना टकले, सुनीता उबाळे, सरीता पाटील, संगिता चोपडे, दीपक दुट्टे, पुरुषोत्तम शिरोडे, वैभव कुलकर्णी, राहुल पाटील, हरिष काळे, किरण काळे आदींसह रहिवाशांनी केली आहे.