नाशिक – गंगापूर धऱण परिसरात आंघोळीसाठी गेलेल्या परप्रांतीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. योगेश जगदिश मौर्या (वय १८, हिरावाडी) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. पंचवटीतील युवक आज गंगापूर धऱणावर पोहायला गेले होते. दुपारी मौर्या पाण्यात बुडू लागला. इतरांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. स्थानीक तातडीने पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला कळविल्यानंतर सायंकाळी उशीरा तरूणाचा मृतदेह हाती लागला याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.