नाशिक – उंटवाडीतील दोंदे पूल ते गोविंदनगरपर्यंत नंदिनी नदीतील चरातील अडथळे दूर करण्याच्या कामाला गुरुवारपासून महापालिकेने सुरुवात केली आहे. पाणी कायम प्रवाहीत राहावे यासाठी नंदिनी नदीत चर तयार करण्यात आला आहे. गाळ, डेब्रीज आणि इतर कचरा यामुळे अडथळे निर्माण होवून प्रवाह थांबला आहे, ठिकठिकाणी डबके तयार झाले आहे. यामुळे प्रदूषण वाढत असून, डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याचा धोका कमी व्हावा, यासाठी या चरातील अडथळे दूर करावे, पाणी प्रवाहीत करावे, अशी मागणी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी केली होती.
सततच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने गुरुवार, ९ डिसेंबरपासून रोबोट मशीनद्वारे चर मोकळे करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारूशिला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, रवींद्र सोनजे, धवल खैरनार, संगिता देशमुख, दिलीप दिवाने, प्रभाकर खैरनार, अनंत संगमनेरकर, सचिन राणे, बाळासाहेब तिडके, नितीन तिडके, सुनीता उबाळे, संगिता नाफडे, आशुतोष तिडके, श्रीकांत नाईक, डॉ. शशिकांत मोरे, यशवंत जाधव, बन्सीलाल पाटील, शैलेश महाजन, संदीप महाजन, वैभव कुलकर्णी, नितीन तिडके, मनोज पाटील, पुरुषोत्तम शिरोडे, बाळासाहेब दुसाने, दीपक दुट्टे, मनोज वाणी, मकरंद पुरेकर, दीपक ढासे यांच्यासह उंटवाडी, जगतापनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, गोविंदनगर, बाजीरावनगरमधील रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहेत.