नाशिक – वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशन (वीसा) तर्फे आणि हॉटेल कोर्टयार्ड बाय मॅरिएट . हायसा ई – मोबॅलिटी यांच्या प्रयोजकत्वातून आणि नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या सहकार्याने उद्या ( तारीख ५) “वीसा टी एस रन डी ऑफ नाशिक” होत आहे. या रन चे माय एफ म हे माध्यम प्रायोजक आहे. आज सायंकाळी या रनचे झेंडा दाखवून औपचारिक उदघाटन . हॉटेल कोर्टयार्ड बाय मॅरियेट चे सरव्यवस्थापक अमोल मोरे. हायसा ई – मोबॅलिटी चे संचालक संदीप आयाचीत , माय एफ म चे स्टेशन हेड श्यांक्की पहाडे आदींच्या उपस्थितीत झाले.
उद्या सकाळी ७:३० वाजेला पहिले वाहन सोडण्यात येईल त्यानंतर एक -एक मिनिटाच्या अंतराने सर्व वाहने सोडण्यात येतील नाशिकच्या ग्रामीण भागात होणाऱ्या या रन साठी ( चारचाकी साठी -१४० कि मी ) व (दुचाकी आणि ई- दुचाकी साठी ८५ कि.मी ) अंतर ठेवण्यात आले आहे. वेग, वेळ आणि अंतराचा सारा खेळ रन च्या निम्मिताने नाशिकरांना पाहायला मिळेल ४ मिनिटे अगोदर चालकांना रोडबुक दिले जाईल त्यानंतर ते प्रत्यक्ष रन मध्ये भाग घेऊन आपले कौशल्य दाखवतील हॉटेल कोर्टयार्ड येथे चालकांनी सकाळी ६:०० वाजेल उपस्थित राहणे बंधनकारक आहे . रन च्या COC तोरण टकले यांनी रन च्या पूर्वसंध्येला सर्व सहभागी चालक व सहचालकांना रन विषयी सविस्तर माहिती दिली आहे. तत्पूर्वी सर्व वाहनांची तपासणी करण्यात आली आहे .