नाशिक – सातपुर विभागातील, त्रंबक रोड, आय.टी.आय. समोर मेघा इंडस्ट्रीज कंपाऊंड लगत ६०० मी.मी. व्यासाची शुध्द पाण्याची ग्रॅव्हेटी मेन पाईपलाईनची दुरुस्ती व संपुर्ण पाईप बदलणे तसेच गंगापुर डॅम पंपीग स्टेशन रस्त्यावरील उर्ध्ववाहीनी (रायझिंग मेन) पाईपलाईनला असलेल्या गळतीची दुरुस्तीचे कामामुळे शनिवार दि. २७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रविवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल अशी माहिती नाशिक महापालिका प्रशासनाने दिली आहे. या दुरुस्तीकामासाठी मुकणे डॅमची २२० के.व्ही फिडर लाईनकरीता (विद्युत वाहीनी) २७ नोव्हेंबर रोजी शटडाऊन असणार आहे. हे सर्व काम करत असतांना महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.