नाशिक -शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या सहकार्याने नाशिक शहरात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.हाच उपक्रम सत्कार्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, दैनिक ‘सामना’चे पत्रकार बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक २४ आणि २५ च्या काही भागात हा उपक्रम राबविण्यात आला. छत्रपती संभाजी राजे व्यायामशाळेपासून फवारणीला सुरुवात करण्यात आली. हेडगेवारनगर, उंटवाडी, जगतापनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, कालिकानगर, खांडेनगर, खांडेमळा, लासुरे हॉस्पिटल परिसर, सिटी सेंटर मॉल सिग्नल परिसर, मेरिडियन गोल्ड, रुंग्ठा एम्पेरिया, रुंग्ठा होरायझन, रामराज्य रो-हाऊस, प्रियंका पार्क, सेजल पार्क, सेजल गॅलक्सी, सेजल प्राईड, सेजल क्लासिक, सनशाईन, श्रीजी स्कायग्रीन, राजीव गांधी उद्यान परिसर, अनमोल व्हॅली, मधुरा पार्क, आशापुरी अपार्टमेंट, सोहम पार्क, वैष्णवी अपार्टमेंट यासह संपूर्ण परिसरात फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
चारुशिलाताई गायकवाड (देशमुख), धवलताई खैरनार, उज्ज्वलाताई सोनजे यांच्यासह भगिनींनी सहभाग घेतला. तिडकेनगर, कर्मयोगीनगर शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, उंटवाडी, जगतापनगर शाखाप्रमुख मयूर आहेर, उद्योजक रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, मुनीश आब्बड, संकेत गायकवाड (देशमुख), अशोक पाटील, मकरंद पुरेकर, तलवारे मामा आदींनी फवारणीसाठी परिश्रम घेतले.या उपक्रमाला प्रतिसाद दिला व सहकार्य केल्याबद्दल नागरिकांचे शिवसेना व सत्कार्य फाऊंडेशनतर्फे जाहीर आभार मानले.
शालिमार येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात उपक्रमाचा शुभारंभ
खा. हेमंत गोडसे, उपनेते बबनराव घोलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, माजी आमदार योगेश घोलप, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शालिमार येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी, १४ मे २०२१ रोजी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.