नाशिक – नाशिक येथील जुने सीबीएस परिसरात नाशिक ते पिंपळनेर, धुळे,जळगाव जाण्यासाठी प्रायव्हेट गाड्या चालू आहेत. त्याच प्रकारे नाशिक येथील स्थानिक चालक संघटनेचे एजंट प्रत्येक प्रवाशांकडून प्रति सीट दोनशे रुपये कमीशन घेत आहेत, या चाललेल्या मनमानी कारभाराला बाहेरगावाहून प्रायव्हेट गाड्या येत आहेत. गाडी चालकांचा देखील विरोध आहे, प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण देखील आहे या मनमानी कारभाराला कधी आळा बसेल अशी दबक्या आवाजात चर्चा प्रवाशांमध्ये होत आहे.
स्थानिक पोलिस प्रशासनाने सूचना दिल्यानंतरही देखील त्या नियमांचे पालन कमिशन एजंट करत नसल्याचेही समोर आले आहे. नाशकातील जुने सीबीएस येथे आज दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलीस अधिकारी देखील येऊन गेले. त्यांनी तेथील गाडी चालक व प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील सूचना दिल्या. परंतु या सूचनेचे काडीमात्र पालन केले जात नाही असे निदर्शनास येत आहे.
कमिशन एजंटचा चाललेल्या मनमानी कारभाराला लवकरच पोलीस प्रशासनाकडून कारवाई व्हावी अशी प्रवाशांकडून मागणी केली जात आहे.
बस भाडया पेक्षा आकारले जात आहे अधिक पैसे
-नाशिक ते पिंपळनेर बस भाड़े १७० आहे, प्रायव्हेट गाड़ी चालक एका प्रवाशाकडून २५० ते ३०० रुपये घेत आहे,परंतु नाशिक येथील स्थानिक कमीशन एजंट हेच भाड़े २०० रुपये प्रति प्रवासी मागे जास्त घेत आहेत,एकूण ५०० रुपये एका प्रवासी मागे, नाशिक ते पिंपळनेर या प्रवासासाठी घेत आहेत.
एका दिवसात कमीशन एजंट कमवतात इतके पैसे
-एका क्रुझर मध्ये सुमारे १२ प्रवासी बसतात,त्यात एका कमीशन एजंट चे प्रति प्रवासी २०० रुपये कमीशन,रोज १५ ते २० गाड्या ये जा करतात म्हणजे १२ प्रवासी एका गाडीत प्रवासा करतात १२ ×२०=२४० प्रवासी एका प्रवासी मागे २०० रुपये ,२००×२४०=४८००० रुपये एका दिवसाला कमीशन एजंट कमवतात.
कमीशन एजंटने ५०० रुपये घेतले
-मी नाशिक ते पिंपळनेर जाण्यासाठी नाशिक येथील जुने सीबीएस येथुन पिंपळनेर जाण्यासाठी माझ्याकडुन कमीशन एजंट ने ५०० रुपये घेतले,कमीशन एजंटचा चाललेला मनमानी कारभार पूर्णपणे बेकायदेशीर आहे,या कमीशन एजंट पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी जेणेकरून या मनमानी कारभाराला चाप बसेल.
-अक्षय कोठावदे (प्रवासी)