नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे आज प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी चार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात सुप्रसिद्ध कवी प्रकाश होळकर, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखिका सिसिलिया कार्व्हालो आणि विधिज्ञ ऍड. राजेंद्र डोखळे यांचा समावेश आहे. रिक्त झालेल्या विश्वस्तांच्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली आहे, आज झालेल्या विश्वस्तांच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.
प्रकाश होळकर – मराठीतील सुप्रसिद्ध कवी ,लेखक. कोरडे नक्षत्र ,मृगाच्या कविता, रान गंधाचे गारुड, अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध. चित्रपटांसाठी गीतलेखन. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा वीसहून अधिक पुरस्काराने सन्मानित.
चंद्रकांत कुलकर्णी- सुप्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी ,युगांत या प्रसिद्ध त्रिनाट्याचे दिग्दर्शक. गांधी विरुद्ध गांधी, ध्यानीमनी ही गाजलेली नाटके मराठी चित्रपट आणि दूरदर्शन, मालिका ,यांचे दिग्दर्शन अनेक पुरस्कारांनी सन्मानित.
सिसिलिया कार्व्हालो- डॉ. सिसिलिया कार्व्हालो या मराठीच्या प्राध्यापिका,असून मुंबई येथील महाविद्यालयात प्राचार्या आहेत . कथा, ललित, बाल वाड्मय, लोकवाड्मय असे अनेक विविधांगी साहित्य त्यांचे प्रकाशित आहे .उमेश, अंतर्यामी, सूर्य किरणात आला, पंख इत्यादी अनेक पुस्तके प्रकाशित विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित बेळगावातील मंथन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा.
ऍड.राजेंद्र पंडितराव डोखळे – नाशिक येथे महाविद्यालयात शिक्षण घेतांना त्यांचे गावी ग्रंथालय सुरु करण्याबाबत सन १९८३ मध्ये कविवर्य कुसुमाग्रज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तेंव्हापासून त्यांचा कुसुमाग्रजांशी निकटचा संबंध आला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांमध्ये ऍड.राजेंद्र पंडितराव डोखळे यांचा नेहमीच सहभाग असतो.