नाशिक – पंचवटीतील तीन पेट्रोल पंप चालकांनी ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’चे उल्लघंन केल्यामुळे त्यांना कारणे दाखव नोटीस पंचवटी पोलिसांनी बजावली आहे. या नोटीसमध्ये तुमचे ना हरकत प्रमाणपत्र का रद्द करु नये असे नमूद करण्यात आले आहे. वाहनचालकांनी हेल्मेट घातले नसेल तर त्यांना पेट्रोल देऊ नये असे आदेशच पोलिसांनी काढले होते. पण, काही पेट्रोल पंप चालक या नियमाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पंचवटी पोलिसांनी या कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या आहे. या कारवाईने ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ चे उल्लघंन करणार्या शहरातील इतर पेट्रोल पंप चालकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस आयुक्त दिपक पांण्डेय यांनी शहरात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहीम सुरु केली त्यानंतर त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. पण, त्यानंतर काही पेट्रोलपंप चालक दुर्लक्ष करत आल्यामुळे पोलिसांनी आता कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.