नाशिक – पेठरोड कुमावतनगर येथे सकाळी झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात एकाच घरातील सहा व्यक्ती गंभीर जखमी झाले. या सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे सर्व परराज्यातील असून मोलमजुरीनिमित्त गेल्या १० ते १५ वर्षांपासून नाशिकमध्ये स्थायिक झाले आहे. सकाळी ७ वाजता ही घटना घडली. गॅस गळती झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. माचिसने वीडी पेटवतांना हा गॅसचा भडका झाला. त्यात खोलीतील लवलेश धरम पाल (रा.अलादात पूर, जिल्हा उत्तर प्रदेश), अखिलेश धरंपाल (रा. सदर), विजयपाल फत्तेपूर (उत्तर प्रदेश), संजय मौर्य (रा. अलादात पूर फतेहपुर, उत्तर प्रदेश), अरविंद पाल (रा. इसापूर फतेहपुर, उत्तर प्रदेश), वीरेंद्र कुमार (रा. बारमपूर, फतेहपुर, उत्तर प्रदेश), सर्वांचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून हे जखमी झाले आहे.