नाशिक – 3 ऑक्टोबर 2021 रोजी अखिल भारतीय पातळीवर घेण्यात आलेल्या अत्यंत अवघड असणाऱ्या Joint Entrance Exam Advance मध्ये 41,800 यशस्वी उमेदवारांपैकी समीर मोहन देशपांडे यांनी 3230 All India Rank प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. सदर यशामुळे अभियांत्रिकी शिक्षण पदवी करीता त्यांचा भारतातील मुंबई, दिल्ली, चेन्नई, कानपूर वा हैद्राबाद येथील नामांकित Indian Institute of Technology मध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे उल्लेखनीय म्हणजे JEE advanced सारख्या अतिशय कठीण परीक्षेसाठी प्रत्यक्ष अभ्यासवर्ग आवश्यक आहे परंतु गेल्या दीड – दोन वर्षांपासून कोरोनामुळे प्रत्यक्ष शिक्षण बंद असल्याने त्यांना सर्व अभ्यास online पद्धतीनेच करावा लागला आहे. समीर देशपांडे हे रंगुबाई जुन्नरे हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून जेईई अॅडव्हान्स परीक्षा करीता स्पेक्ट्रम क्लासचे मार्गदर्शन मिळाले.