नाशिक – तिडकेनगर, कर्मयोगीनगर भागात पाणीपुरवठ्याची नवीन पाईपलाईन टाकावी, अशी मागणी शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे. याबाबतचे निवेदन महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांना दिले. उंटवाडीतील प्रभाग क्रमांक २४ मधील तिडकेनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर, कालिका पार्क या भागात मागील वर्षी काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करण्यात आली. येथे काही भागात मात्र वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या दोन-तीन इंची, कमी व्यासाच्या पाईपलाईन आहेत. त्या कुजल्याने नादुरुस्त असून, सतत गळती होते. पाणी वाया जाते. या भागाचा मोठ्या प्रमाणात वेगाने विकास होत आहे. घरे आणि लोकसंख्याही वाढत आहे. यामुळे पाण्याची गरजही त्यातुलनेत दिवसेंदिवस वाढत आहे. विकासाचा वेग पाहता भविष्याचा विचार करून जुन्या पाईपलाईन बदलून नवीन मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकणे आवश्यक आहे. गुरुवारी, २३ सप्टेंबर रोजी याबाबतचे निवेदन सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, श्रीकांत नाईक, दिलीप दिवाणे, मकरंद पुरेकर, मनोज वाणी, श्याम अमृतकर, अशोक पाटील, विनोद पोळ, दीपक दुट्टे, संजय टकले, मगन तलवार, सचिन राणे, शैलेश महाजन, संदीप महाजन, मनोज कोळपकर, डॉ. राजाराम चोपडे, ज्ञानेश्वर महाले, आशुतोष तिडके, राहुल काळे, बापू आहेर, दिगंबर लांडे, घनश्याम सोनवणे, किरण काळे, राहुल काळे, बन्सीलाल पाटील, सचिन जाधव, मनोज पाटील, साधना कुवर, नीलिमा पाटील, मीना टकले, उज्ज्वला सोनजे, धवल खैरनार, संगिता देशमुख, कांचन महाजन, मोहन पाटील, समीर सोनार, प्रशांत अमृतकर, संकेत गायकवाड (देशमुख), प्रथमेश पाटील आदींनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. नवीन पाईप टाकल्यास पाणीटंचाईवर कायमचा तोडगा निघणार आहे.