नाशिक – नाशिक महानगरपालिकेतर्फे गणेश विसर्जन करिता दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने स्लॉट बुक करण्याचा उपक्रम राबविण्यात येतो सदर उपक्रम हा या वर्षीही राबविण्यात येत आहे. तसेच कोविड-१९ च्या अनुषंगाने शासनाचे निर्देशाप्रमाणे विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी न होऊ देण्यासाठी मनपातर्फे Tank on Wheel हा अभिनव उपक्रम राबविण्यात आहे. सदर उपक्रमात नागरिकांच्या मागणीप्रमाणे त्यांना ठराविक ठिकाणी गणेश विसर्जना करिता टॅंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर उपक्रमाच्या अनुषंगाने शहरातील ५० किंवा त्यापेक्षा जास्त फ्लॅट्स असणाऱ्या अपार्टमेंट यांच्याकरिता मागणीनुसार फिरता विसर्जन टॅंक उपलब्ध करून द्यावयाचा आहे. मनपाच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने शहरातील सर्व सहा विभागातील ५० किंवा त्यापेक्षा जास्त फ्लॅट्स असणाऱ्या अपार्टमेंट यांच्याकडून विसर्जनाकरिता नोंदणी करण्यात येऊन Tank on Wheel ची मागणी करण्यात आली आहे. मनपाच्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे .