रविवार, सप्टेंबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंचवटी क्रिडा संकुलात २९५ बेडचे भुजबळ कोविड केअर सेंटर, रविवारी उदघाटन

by Gautam Sancheti
एप्रिल 17, 2021 | 2:31 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210417 WA0018

 – रविवारी खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ऑनलाइन उदघाटन

– मेट भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,समता परिषद व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी बेडची व्यवस्था

नाशिक –  मेट भुजबळ नॉलेज सिटी व महानगर पालिका , नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुल,नाशिक येथे १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी अशा एकूण २९५ बेडची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरचे उदघाटन रविवार दि.१८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन स्वरूपात होणार असल्याची माहिती संयोजक आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. *स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १८० ऑक्सिजन बेडस असलेले नाविन्यपूर्ण कोविड केअर सेंटर नाशिकमध्ये प्रथमच उभे राहत आहे.* या कोविड सेंटर मुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

IMG 20210417 WA0027

सदर कोविड सेंटरमध्ये १८० बेडसाठी ऑक्सिजन लाईनची  स्वतंत्र जोडणी केलेली आहे. या ऑक्सिजन लाईनचे मटेरियल सुरत येथून मागवून रात्रंदिवस काम करून ही ऑक्सिजन लाईन उभारण्यात आली आहे.ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले वेपोरायझर बडोदा,गुजरात येथून आणण्यात आले आहे. ऑक्सिजन व्यवस्थेसाठी लागणारे ड्युरा सिलिंडर वेल्लूर,कर्नाटक येथून आणण्यात  आले आहेत तर पुरेशा ऑक्सिजन साठ्यासाठी आवश्यक असलेले १ केएल  क्षमतेचे ऑक्सिजन टँक पुणे येथून आणण्यात आणले आहे. १८० रुग्णांना सतत पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे रुग्णांच्या सोयीसाठी दिल्ली येथून ५० एअर कुलर मागवून या ठिकाणी बसविण्यात आलेले आहे.
सदर कोविड केअर सेंटरसाठी भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून प्रख्यात सर्जन डॉ.अभिनंदन जाधव यांच्यासह ५ एमबीबीएस व ४ बीएचएमएस असे १० डॉक्टर तसेच १५ प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कोविड सेंटरसाठी एक अॅडमीन, तीन फार्मसी ऑफिसर, पाच रिसेप्शनिस्ट, १५ वार्ड बॉय, १० सिक्युरिटी गार्ड भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉक्टर तसेच  नाशिक मधील नामांकित फिजिशियन डॉ.शितल गुप्ता आणि डॉ.अतुल वडगांवकर यांचेही सहकार्य लाभणार आहे. रुग्णांना ने-आण करण्यासाठी किंवा संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
हे कोविड केअर सेंटर मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्यातून उभारण्यात येत आहे. सामाजिक दायित्वातुन उभारलेले आणि ऑक्सिजन बेड्स असलेले हे एकमेव कोविड केअर सेंटर आहे. या ठिकाणी रुग्णांना औषध उपचारासह दोन वेळचे पौष्टिक  जेवण, अंडी आणि  नाश्ता,फळांचा रस,चहा, रात्रीचे हळदयुक्त दुध,शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी वाचनालय व बुद्धिबळ,कॅरम इ.खेळ,कलाप्रेमींसाठी चित्रकलेची व्यवस्था यांसह करमणुकीसाठी ३ मोठे स्क्रीन तसेच दोन दूरदर्शन संच आणि चार मोबाईल चार्जर युनिट यांसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मोठ्या स्क्रीनवर सकाळी योगा व प्राणायामचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर मधुर संगीत, चित्रपट,सध्याच्या घडामोडी यासह सायंकाळी आयपीएल क्रिकेटच्या मॅचेस दाखविण्यात येणार आहेत.जेणेकरून रुग्णांचे मनोरंजन होऊन त्यांचा मानसिक ताण कमी होईल.तसेच आजाराची भीती दूर होण्यासाठी मदत होईल अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली.

IMG 20210417 WA0029

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सातपूर : विनाकारण रस्त्यावर फिरणारे चार जण पॉझिटिव्ह, पोलिसांची कारवाई

Next Post

नाशिक कोरोना अपडेट – शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, २१ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 20, 2025
cricket
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये नोव्हेंबर मध्ये दोन रणजी सामन्यांचा थरार….हे सामनेही होणार

सप्टेंबर 20, 2025
crime1
क्राईम डायरी

अनैतिक संबधाच्या संशयातून परप्रांतीय तरुणाचे अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

सप्टेंबर 20, 2025
rajanatsing
राष्ट्रीय

संरक्षण मंत्री या तारखे दरम्यान मोरोक्कोला देणार भेट…दोन दिवसाचा दौरा

सप्टेंबर 20, 2025
rape
क्राईम डायरी

चार महिन्यापासून महिलेच्या मोबाईलवर अश्लिल फोटो, व्हिडीओ व संदेश पाठवले…गुन्हा दाखल

सप्टेंबर 20, 2025
fir111
क्राईम डायरी

नाशिकमध्ये दिग्दर्शक असलेल्या तरुणाची साडेपाच लाख रूपयांची अशी केली फसवणूक

सप्टेंबर 20, 2025
Screenshot 20250920 151721 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये गावगुंडाकडून पत्रकारांना बेदम मारहाण…काठी व दगडाचा वापर

सप्टेंबर 20, 2025
cbi
संमिश्र वार्ता

CBI ने या स्पर्धा परिक्षा घोटाळ्यातील भरती प्रकरणी पाच आरोपींना केली अटक…IAS सह उच्च अधिकारी जाळ्यात

सप्टेंबर 20, 2025
Next Post
carona 11

नाशिक कोरोना अपडेट - शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011