नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करून जिल्हाधिकारी श्री. पारधे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (इगतपुरी/ त्र्यंबकेश्वर) पवन दत्ता, उपविभागीय अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, सीमा अहिरे, शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राजेंद्र वाघ, तहसिलदार मंजूषा घाटगे, आबासाहेब तांबे, अमोल निकम, उषाराणी देवगुणे, अमित पवार यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.