नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अन्न भेसळ अधिकारी सांगून पान टपरी धारकांकडून पैशांची वसुली तोतंया अन्न भेसळ अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरात हा तोतया कैद झाला आहे. तो स्वतःला अन्न भेसळ अधिकारी सांगून हॉटेल, पान टपरी धारकांकडून जबरी वसुली करीत आहे. यामध्ये अनेक पान टपऱ्या धारकांस मी अन्न भेसळ अधिकारी आहे. तू अवैध गुटखा व्यवसाय करतोस पन्नास हजार ते एक लाख रुपये दे अन्यथा तुला खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देऊन लाखो रुपये उकळले असल्याची घटना सातपूर परिसरात घडली आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन अधिकारींशी संपर्क साधला असता त्यांनी तो आमचा कर्मचारी नसल्याचा खुलासा केला आहे.
जबरी वसुली करणारा हाच अन्न भेसळ अधिकारी कोण आहे. या संदर्भात अजून नाशिकच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार का दाखल झाली नाही. सीसीटीव्ही दिसणारा हा अधिकारी आहे तरी कोण असा प्रश्न उपस्तित होत आहे. सातपूर भागातील हॉटेलमधला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सदरील हॉटेल मालक या तोताया अधिकाऱ्याला मोजून दहा हजार रुपये देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
टोपी चष्मा जॅकेट आणि अधिकाऱ्यांसारखा पेहराव असलेला हा तोतया अधिकारी हॉटेल मालकाला बोट करून दम देतो आहे आणि त्याच्याकडून दहा हजार रुपयाची वसुली करताना दिसत आहे. रोख रक्कम घेतल्यानंतर सदरील तोताया अधिकारी हॉटेल मालकाशी हस्तांदोलन व तेथील कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन करून निडरपणे त्या हॉटेलमधून जाताना दिसत आहे. अशीच जर सर्रास नाशिकमध्ये लूट होत असेल तर व्यापाऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.