नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सततच्या पाणी टंचाईच्या निषेधार्थ गुरुवारी कर्मयोगीनगरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले. जलकुंभाजवळ निदर्शने करीत महापालिका अधिकार्यांना जाब विचारण्यात आला. पुरेसा आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल, नवीन जलकुंभ पंधरा दिवसात सुरू करण्यात येईल, या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रभाग क्रमांक २४ मधील कर्मयोगीनगर, तिडकेनगर, जगतापनगर, उंटवाडी, प्रियंका पार्कसह प्रभागात सहा महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई आहे. दोन महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने व दूषित पाणी येत आहे. महापालिका आयुक्तांसह अधीक्षक अभियंता यांची भेट घेवून निवेदने दिली, तरीही सुधारणा झाली नाही. सतत टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने गुरुवारी संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. कर्मयोगीनगर येथील जलकुंभाजवळ निदर्शने करण्यात आली. हा जलकुंभ त्वरित सुरू करा, हक्काचे पुरेसे पाणी द्या, अशी घोषणाबाजी करण्यात आली. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल गरूड, उपअभियंता हेमंत पठे हे आंदोलनस्थळी हजर झाले.
पंधरा दिवसात कर्मयोगीनगरच्या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल, संपूर्ण प्रभागाला शुद्ध व पुरेसे पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, संगीता देशमुख, वंदना पाटील, सविता देवरे, नंदिनी जाधव, भारती चौधरी, मनीषा जोशी, नीलिमा चौधरी, गीता येवला, सरोज रसाळ, प्रतिभा वडगे, रेखा भालेराव, ज्योत्स्ना जाधव, चारुशीला पत्की, वृषाली तिडके, कलावती तिडके, जयश्री मगर, पौर्णिमा पेंढारकर, विशाखा थोरात, दिप्ती काळे, सिंधुताई मिंधे, मेघा तायडे, जया भंडारे, साधना महाले, किरण काळे, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. धनराज चौधरी, डॉ. राजाराम चोपडे, दिलीप येवले, शांतीलाल पवार, शामकांत शुक्ल, सुपडू बढे, लक्ष्मीकांत गर्गे, गजेंद्र मुळे, मनोज अट्रावलकर, महेश जाधव, प्रभाकर वाकसर, तुकाराम सोनवणे, दीपक दुट्टे, राजेंद्र पाटील, आनंद थोरात, राम भंडारे, संग्राम देशमुख, बाळासाहेब पेंढारकर, संकेत गायकवाड (देशमुख), तेजस अमृतकर आदी यावेळी हजर होते.