नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): नाशिक शहरातील रविशंकर मार्ग, विधाते नगर येथील दानशूर व्यक्ती विद्या ज्ञानेश्वर पन्हाळे यांनी माजी सैनिक, वीरपत्नी व त्यांचे अवलंबितांच्या पुनर्वसनासाठी ध्वजदिन निधीच्या माध्यमातून रूपये १ लाख रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना सुपूर्द केला, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्पनंट कर्नल विलास सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी श्रीमती विधाते यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.