नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): केंद्रीय गृहखात्याने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरक्षेच्या उपयायोजनांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क व सजग रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हावासियांना केले आहे.
आज जिल्हाधिकारी व नियंत्रक, नागरी संरक्षण, नाशिक यांच्यामार्फत शहरातील के.टी.एच.एम कॉलेज बोट क्लब मैदान, नाशिक येथे ‘ऑपरेशन अभ्यास’ सराव मॉक ड्रीलचे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, तहसीलदार गणेश जाधव, नागरी संरक्षण उपनियंत्रक अतुल जगताप, सहा उपनियंत्रक देवेंद्र बावस्कर, विभागीय क्षेत्ररक्षक मिनाक्षी गवळी, मंगला काकड, योगेंद्र पाटील, मनोहर जगताप, शुभम क्षीरसागर, मख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, घटना नियंत्रण अधिकारी योगेंद्र पाटील, पोलिस निरिक्षक संतोष बावस्कर, यांच्यासह नागरी संरक्षण दल, अग्नीशमन दल, गृह संरक्षण दल, वैद्यकीय सहाय्यता दलातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, आज जिल्हाधिकारी कार्यालयास एअर फोर्स वरून संदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय व एअर रेड झालेल्या मॉक ड्रिलच्या ठिकाणी या ठिकाणी सायरन वाजविण्यात येवून त्यांची कार्यक्षमता तपासण्यात आली. त्यानंतर आग लागलेल्या ठिकाणाहून जखमींना सुरिक्षत रित्या बाहेर काढून रूग्णवाहिकेपर्यंत पोहचविणे, अग्नीशमन दलाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविणे, जखमींना प्रथमोपचार देणे हे सर्व मॉक ड्रीलचा सराव 30 मिनिटात पूर्ण झाला. यापुढे प्रत्यक्ष असे वेगवेगळ्या प्रकराचे वेगवेगळया प्रकराचे हल्ले झाले तर यातून नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासन व नागरी संरक्षण दल सदैव सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले.