नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणेच यंदाही महाराष्ट्रातील विविध भागात श्रीकृष्ण जयंती कथा जन्माष्टमीचा सण उत्सव साधेपणाने साजरा झाला आहे. घरोघरी तसेच अनेक मंदिरामध्ये या निमित्त मोठी आकर्षक आरास करण्यात आली होती. महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदिरांमध्ये यानिमित्त कोरोना चे नियम पाळून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच इस्कॉनच्या मंदिरांमध्ये देखील आकर्षक सजावट करण्यात आली होती
राज्य सरकारने कोरोना नियमाचे पालन करीत गर्दी टाळण्यासाठी मुंबई, ठाणे सह अन्य जिल्हयातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन दहीहंडीला परवानगी नाकारली आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वांना वेध गोकुळाष्टमीचे वेध लागतात. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. आज ३० ऑगस्ट २०२१ यादिवशी श्रावण वद्य अष्टमी असून जन्माष्टमी सोहळा झाला. हा सोहळा प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या परंपरेने साजरा केला जातो. तर यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे हा सण साधेपणातेने घरोघरी आणि मंदिरांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पुजारी आणि काही भक्तगणांच्या उपस्थितीत साजरा केला गेला आहे.