इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर नाशिकचे पर्यटकही अडकले. या पर्यटकांना त्यांचा स्थानिक ड्रायव्हर आदिलभाई यांनी घरी घेऊन जेवू घातले. त्यानंतर हॅाटेलमध्ये त्यांना सोडले. याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या घटनेनंतर ही कश्मीरची वस्तुस्थिती… रूपाली ठोंबरे आपल्या कुटुंबासह सहलीला गेल्या होत्या. त्यांच्यासह जवळपास १०० लोक अडचणीत आल्यानंतर स्थानिक आदिलभाई यांनी आश्रय दिला सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली…
आतंकवाद्यांनो, हेही चित्र एकदा बघून घ्या… हिंदू संकटात असताना मुस्लिम मदतीला धावून येत आहेत.. पर्यटन बंद झाले तर कश्मीरी मुस्लिम उपाशी मरेल या विचाराने हिंदूंच्या डोळ्यात पाणी येत आहे… राजकारण करणाऱ्या नेत्यांनो आणि गोबरभक्तांनो… हा हल्ला जात किंवा धर्मावरचा नाही हा हल्ला माणुसकी वरचा आहे… हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावरचा आहे…ऊरी , पठाणकोट, पुलवामा आणि आता पहलगाम झाल्यानंतरही अजूनही कुणाला वाटत असेल की हा देश सुरक्षित हातात आहे तर शोकांतिका आहे…
मास्टरमाईंड सैफुल्लाह खालिद
या हल्यामागे असलेल्या दहशवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. आदित गुरु, आसिफ शेख, सुलेमान शाह, अबू तल्हा अशी त्यांचे नावे आहे. यातील दोन स्थानिक आहेत. तर दोन जण पाकिस्तानी आहेत. आदिल गुरी हा अनंतनाग जिल्हयातला आहे. तर आसिफ शेख हा सोपोरचा आहे. या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड हा सैफुल्लाह खालिद उर्फ कुसरी असल्याचे समोर आले आहे. तो टीआरएफ या दहशवादी संघटनेचा प्रमुख असून हाफिज सईदचा तो निकटवर्तीय आहे.