इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकच्या गंगापूर रोडवर पाहिल्याचा दावा स्थानिकांनी केल्यामुळे खळबळ माजली आहे. तीन महिन्यापासून आंधळे फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहे.
गंगापूररोडवरील दत्त मंदिर चौकात मंदिराजवळ सकाळी ९.३८ वाजता कृष्णा दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्याच्यासोबत आणखी इसम होता. ते दोघेही काळ्या रंगाच्या बाईकवर बसून गेल्याचा दावाही प्रत्यक्षदर्शींननी केला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सीसीटीव्ही फूटेजीची तपासणी करुन खातरजाम कऱण्यात येत आहे.
कृष्णा आंधळे याआधी जानेवारी महिन्यात देखील दिसल्याची चर्चा होती.