नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हिंदू विरोधी मंडल अधिकारी अनिल एकनाथ रोकडे यांची पदावरून हकालपट्टी करून चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन सकल हिंदू समाज नाशिक जिल्हा, अखिल भारतीय संत समिती धर्म सभा व पुरोहित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
नाशिक महापालिकेच्या हद्दीतील शासकीय जागा असताना आपल्या पदाचा गैरवापर करून अनिल रोकडे यांनी भुमापन क्रमांक ४८०/३अ/३ब/६ वरील नोंद क्रमांक २०६४५४ दिनांक १५.०१.२०२५ रोजी बोगस नोंद करीत वक्फ बोर्डाचे नाव फेरफार सदरी दाखल केले, अशा हिंदू विरोधी अधिकाऱ्याला नाशिक मध्ये पदावर राहण्याचा अधिकार नाही राज्यात व देशांमध्ये हिंदूंचं सरकार असताना हिंदू विरोधी कारवाई करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची यापुढे गय केली जाणार नाही तसेच या निवेदनाद्वारे आम्ही आपणास विनंती करतो की वरील अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करुन हकालपट्टी करण्यात यावी तसेच आपल्या अधिकाराचा गैरवापर करत त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेत अवैधरित्या संपत्ती कमावली असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे
तरी अनिल रोकडे यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी तोपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्यात येऊन त्यांचे वेतन थांबविण्यात यावे तसे न झाल्यास सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल या वेळी होणाऱ्या सर्व परिणामास जिल्हाधिकारी हे जबाबदार असतील असा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला
सदर निवेदन देतांना श्री महंत मंडलाचार्य पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती धर्मसभा प्रदेश अध्यक्ष स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज ,धर्म जागरण सभेचे अध्यक्ष विनोद शिंदे , श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कदम, सरचिटणीस निकेश पाटील , प्रदेश प्रवक्ते यश बच्छाव, जिल्हाप्रमुख किशोर वडजे, जिल्हाप्रमुख तुषार भोसले,महानगरप्रमुख मंगेश कापसे,उपमहानगर प्रमुख राज पुरोहित, राहुल पगार, तुषार निमसे, आशुतोष आरोटे, नंदकिशोर शिरोडे आणि कैलास देशमुख यांच्या सह सकल हिंदू समाज किलो भारतीय संत समिती धर्मसभा आणि पुरोहित महासंघाचे पदाधिकारी आणि हिंदू समाजाचे नेते उपस्थित होते.