इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
त्र्यंबकेश्वररस्त्या लगत असलेल्या संदीप फाऊंडेशन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मधमाशा चावल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी ही घटना घडली त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे, सदर घटनेत १५ विद्यार्थी जखमी झाले आहे. महाविद्यालयाच्या आवारात मधमाशांचे पोळे कोसळले त्यानंतर मधमाशांनी विद्यार्थी व कर्मचारीवर हल्ला केला.
सर्व जखमी विद्यार्थ्यांना सातपूर अशोकनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. पैकी तीन विद्यार्थ्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप फाऊंडेशनमधील एस बिल्डींग जवळ मंगळवारी दुपारी तीन वाजता अचानक मधमाशांचे मोहोळ उठत त्यांनी थेट विद्यार्थ्यांना हल्ला चढवला. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी इतरत्र पळ काढला, मात्र पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना मदमाश्यांनी त्यांना चावा घेतला. यात काहींना किरकोळ जखमा झाल्या असून चार विद्यार्थ्यांच्या डोळे आणि काना जवळ चावा घेतल्याने गंभीर जखमी झाले. विद्यार्थ्यांचा आरडा ओरडा ऐकू आल्याने त्यांना वाचवणाऱ्या सुरक्षा रक्षक व बाउन्सर यांच्यावरी मधमाश्याने जोरदार हल्ला केला आहे. यात
शुभम गुंजाळ यास मधमाशानी सर्व बाजूनी हल्ला केला असून त्यावर अतिदक्षतता विभागात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
https://www.facebook.com/share/v/19uMWetUrP