नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक – पुणे रोडवरील काठे गल्ली सिंग्नलजवळ असलेल्या एका धार्मिक स्थळाच्या वादातून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी याभागातील अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परिसरात जमावबंदी आदेशही लागून करण्यात आला आहे.
सकाळपासून या भागात पोलिसांच्या गाड्यांचा ताफा मोठ्या प्रमाणात दिसायला सुरु झाली. त्यानंतर काही ठिकाणी बॅरिकेडींग करण्यात आले आहे. या भागात दर्गा अतिक्रमण करुन बांधण्यात आले असून हे अवैध असल्याचे हिंदू संघटनांच म्हणणं आहे. त्यामुळे हिंदू संघटनांनी या विरोधात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्याचा प्लान बनवला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

