शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या पथकाकडून प्रयागराज येथील महाकुंभमेळा नियोजनाचा अभ्यास… स्थानिक प्रशासनाशी साधला संवाद

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 18, 2025 | 4:29 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250218 WA0330 2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रयागराज येथील महाकुंभमेळा-२०२५ नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या पथकाने तेथील मेळाक्षेत्र, आखाडे, घाट आदींना भेटी देऊन प्रत्यक्ष माहिती घेतली. याशिवाय, या पथकाने तेथील अंतर्गत वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन स्वच्छता आदींबाबत राबविलेल्या उपक्रमांचीही पाहणी केली.

नाशिकच्या पथकात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. हे पथक सोमवारी (दि. १७) रोजी नाशिकहून प्रयागराज येथे रवाना झाले होते.

येत्या २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी केली जात आहे. या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यास या पथकाने भेट देऊन पाहणी केली. प्रयागराज महाकुंभमेळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय किरण आनंद यांनी नाशिकच्या पथकासमोर सविस्तर सादरीकरण करून संवाद साधला. त्यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली आणि पथकातील सदस्यांच्या शंकांचे समाधान केले.

पथकाने आज मेळा क्षेत्र, प्रयागराज येथील विविध घाट, आखाडे आदींना भेटी दिल्या. तेथील गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रणासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना, भाविकांना दिल्या जात असलेल्या सुविधा आदींची माहिती घेतली.

याशिवाय, या पथकाने तेथे स्थापण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) येथेही भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. पोलीस, नागरी प्रशासन, अग्निशमन व आपत्कालीन व्य्वस्थापन आदी यंत्रणांचे अधिकारी याठिकाणी उपस्थित आहेत. प्रयागराज शहरात विविध ठिकाणी लावलेल्या अडीचहजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सनियंत्रण येथून होत आहे. तसेच केंद्र सरकारच्या रेल्वे, दूरसंचार, आपत्ती व्यवस्थापन, बीएसएफ यांसह विविध विभागांचे अधिकारी याठिकाणच्या कक्षासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या कामाचे स्वरुपही पथकाने समजावून घेतले.

नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ५० दूरध्वनी संच असलेल्या सुसज्ज टेलिफोन कॉल सेंटरच्या कामकाजाविषयी पथकाने जाणून घेतले. नागरिकांच्या अडचणी, नातेवाईक हरवले तर त्यांच्या मदतीसाठीचा हा संपर्क कक्ष आहे. पथकाने ‘डिजीटल महाकुंभ’ला भेट देवून भाविकांना देण्यात येणाऱ्या माहितीविषयी जाणून घेतले. याबरोबरच या पथकात समाविष्ट विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागांशी निगडीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेवून प्रयागराज येथे करण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोन महिलांचा परिचीतांनी केला विनयभंग

Next Post

राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हे आहे भरगच्च कार्यक्रम…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी आज महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषद 1 1024x574 1

राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हे आहे भरगच्च कार्यक्रम...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
Pharmacy

एसएमबीटी फार्मसीच्या ७२ जणांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड; लाखोच्या पॅकेजवर भरती

ऑगस्ट 7, 2025
क्रीडा व युवक कल्याण विभाग आढावा बैठक 1 1 scaled 1

नव्या खात्याची नवी जबाबदारी….क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी पदभार घेताच दिले हे निर्देश

ऑगस्ट 7, 2025
Screenshot 20250807 190254 Facebook

केंद्रीय अर्थमंत्री व वाणिज्यमंत्री यांची नाशिकच्या तिन्ही खासदारांनी घेतली भेट…कांदा प्रश्नांकडे वेधले लक्ष

ऑगस्ट 7, 2025
RUPALI

खेवलकर यांच्या हिडन फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ, १४९७ नग्न फोटो…रुपाली चाकणकर यांची खळबळजनक माहिती

ऑगस्ट 7, 2025
IMG 20250807 WA0307 2

या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा सर्वोत्कृष्ट तर ही नाट्यकृती द्वितीय

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011