इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे येथे होत असलेल्या, राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) टी-ट्वेंटी स्पर्धेत , वरिष्ठ महिला नाशिक जिल्हा संघाने, लातूर व विलास क्लब ,पुणे संघावर दणदणीत विजय मिळवले.
विलास क्लब ,पुणे विरुद्ध ईश्वरी सावकारने नाबाद ६२, तेजस्विनी बाटवालने २८ धावा करून तर पूजा वाघने ३ तर प्रियांका घोडकेने २ बळी घेत नाशिक जिल्हा संघाला ९ गडी राखून विजयी केले.
तर लातूर विरुद्ध प्रियांका घोडकेने ५१ धावा व १ बळी , ईश्वरी सावकारने ४४ , रसिका शिंदेने २६ धावा आणि लक्ष्मी यादवने ३ व वैभवी बालसुब्रमणीयमने २ बळी घेत नाशिक जिल्हा संघाला ११८ धावांनी दणदणीत विजयी केले.