नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात पाईप लाईन लिकेजमुळे काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. त्यासाठी महानगरपालिकेने निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिका हद्दीतील नविन नाशिक विभागात येणाऱ्या पवननगर टाकी येथे पाईप लाईन लिकेज असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार सदर ठिकाणचे काम हाती घ्यावयाचे आहे. सदर काम मोठ्या स्वरूपाचे असल्याने नविन नाशिक पाणी पुरवठा मंगळवार २१ जानेवारी रोजी खाली नमूद केलेल्या ठिकाणी पाणी पुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे. २२ जानेवारी रोजी होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची प्रभागातील नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
प्र. क्र. २४ – उंटवाडी, जगतापनगर, तिडकेनगर, कालीका पार्क
प्र. क्र २५ – रायगड़ चौक, शनिचौक, पवननगर भाजी मार्केट, अक्षय चौक, उदय कॉलनी, श्रीरामनगर, सप्तश्रृंगी
चौक
प्र. क्र २७ – महाकाली चौक, राजरत्ननगर, दुर्गामाता मंदिर, राम मंदिर
प्र. क्र. २८ – शुभम पार्क