नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगरपालिकेने जुने नाशिक परिसरातील महात्मा फुले भाजी मंडई येथे महात्मा फुले कत्तलखाना असे फलक लावून हटविण्यात आले. या घटनेचा महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, कार्यकारिणी अध्यक्ष शशी हिरवे, कार्याध्यक्ष शरद मंडलिक, महिला अध्यक्ष तेजश्री काठे यांनी तीव्र विरोध करून महात्मा फुले भाजी मंडईचे नाव बदल्यास महापालिकेला कुलूप लावणार असल्याचा इशारा अंबादास खैरे यांनी दिला.
महात्मा जोतीराव फुले हे एक महान समाजसुधारक आणि विचारवंत होते. त्यांनी भारतातील समाजावर खोलवर प्रभाव पाडला. त्यांचे कार्य आजही प्रासंगिक आहे आणि ते आपल्या सर्वांना प्रेरणा देते. फुले यांच्या विचार जनतेत पोहचून समाज सुधारला गेला पाहिजे. त्यांचे आचार व विचारांकरिता त्यांचे पुतळे उभारले जातात तसेच अनेक महत्त्वाच्या ठिकाणी किंवा रस्त्यांचे महान पुरुषचे नाव देण्यात येते.
जुने नाशिक परिसरातील दूध बाजार येथील भाजी मार्केटला देखील महात्मा फुले भाजी मंडई असे नाव देण्यात आले आहे. परंतु त्यांचे नाव बदलून महात्मा फुले कत्तलखाना असे केल्याने अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या. यानंतर सदरचा फलक तातडीने हटविण्यात आला. या घटनेचा महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीने तीव्र विरोध केला असून मंडई चे नाव बदल्यास महापालिकेला कुलूप लावणार असल्याचा इशारा यावेळी समिती अध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिला.