नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा शनिवार २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ दरम्यान बंद राहणार आहे. याबाबत मनपाने निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, मनपाचे मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथुन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशन येथे शनिवार २८ डिसेंबर रोजी महावितरण कंपनीमार्फत विविध दुरुस्ती कामे करणेत येणार आहेत. सबब, म.रा.वि.वि. कंपनी कडून शनिवार २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ दरम्यान शट डाऊन घेणेत येणार आहे. त्यामुळे मनपाचे मुकणे डॅम रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुध्दीकरण केंद्राला होणारा रॉ वॉटरचा पुरवठा सदर कालावधीत बंद राहणार आहे.
शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ दरम्यान विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहील, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.