सोमवार, नोव्हेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

१७ वर्षीय रुग्ण कर्करोगमुक्त, एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्यूटमध्ये अत्याधुनिक कार-टी सेल थेरपी यशस्वी

डिसेंबर 17, 2024 | 4:34 pm
in संमिश्र वार्ता
0
SMBT Hospital 2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परदेशात अत्यंत महागडी समजली जाणारी व कर्करोग उपचारावर महत्वाची असलेली ‘कार-टी सेल’ (CAR-T) थेरपी भारतीय संशोधनानंतर सवलत उपलब्ध झाली आहे. या सवलतीचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होण्यास सुरुवात झाली आहे. ही थेरपी नुकतीच एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये १७ वर्षीय रुग्णावर यशस्वी पार पडली. या रुग्णाचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले असून हा रुग्ण पूर्णपणे कर्करोगमुक्त झाला आहे. ही थेरपी ल्युकेमिया आणि लिम्फोमा यांसारख्या बी-सेल कर्करोगांवर (रोगप्रतिकारक प्रणालीच्या पेशींमध्ये तयार होणारा कर्करोगाचा प्रकार) उपचार करण्यासाठी महत्वाची असल्याचे एसएमबीटी हॉस्पिटलचे रक्तविकार कर्करोगतज्ञ डॉ गिरीश बदरखे यांनी सांगितले.

कार-टी सेल थेरपी ही मुंबई आयआयटीचे शास्रज्ञ डॉ. राहुल पूरवार आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कर्करोग विभागातील प्रोफेसर डॉ. हसमुख जैन यांच्या पुढाकाराने रक्ताच्या कर्करोगावर भारतीय संशोधन प्रणाली आहे. अलीकडेच इम्म्युनोअॅक्ट आणि एसएमबीटी हॉस्पिटल करारबद्ध झाले. यानंतर झालेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये दोन रुग्णांवर एसएमबीटीत यशस्वी उपचार करण्यात आले होते. यानंतर एसएमबीटीच्या विशेष केअर प्लस विभागात नागपूरच्या १७ वर्षीय यशवंत (नाव बदललेले) वर तिसरी कार-टी सेल थेरपी करण्यात आली. या रुग्णाचे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आले असल्यामुळे हा रुग्ण कर्करोगमुक्त झाल्याचे तज्ञांनी सांगितले.

सवलतीच्या दरात होत असलेल्या उपचारपद्धतीचा लाभ आता सर्वसामान्य रुग्णांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. कार-टी सेल थेरपी उत्तर महाराष्ट्रात एकमेव एसएमबीटी हॉस्पिटल येथे सुरु झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील रुग्णांसाठी आशेचा किरण एसएमबीटी हॉस्पिटल बनले आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठया चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये जगातील सर्वात अत्याधुनिक थेरपी करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कार-टी सेल थेरपीमध्ये शरीरातील पांढऱ्या पेशींना औषधोपचारांच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्तींमध्ये बदलले जाते. त्यामुळे या पेशी शरीरातील कर्करोग पेशींचा नाश करण्यासाठी काम करू लागतात. टी पेशी रुग्णाच्या रक्तातून गोळा केल्या जातात आणि मानवनिर्मित रिसेप्टरसाठी जनुक जोडून प्रयोगशाळेत अनुवांशिकरीत्या सुधारित केले जातात, ज्याला काइमरिक प्रतिजन रिसेप्टर किंवा ‘सीएआर’ म्हणतात. हे विशिष्ट कर्करोग पेशी प्रतिजन ओळखण्यात मदत करते. त्यानंतर, सीएआर-टी पेशी रुग्णाला परत केल्या जातात. अशा माध्यमातून कार-टी सेल थेरपी कार्य करते.

जगातील कॅन्सर उपचारावर होत असलेल्या कोट्यावधी रुपयांचा खर्च भारतीय संशोधनामुळे आता लाखांत आला आहे. एसएमबीटी हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी सामंजस्य करारामुळे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे तांत्रिक मार्गदर्शनाने एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट साकारण्यात आले आहे. याठिकाणी सुसज्ज कर्करोग विभाग कार्यरत असून तज्ञ आणि अनुभवी कर्करोग तज्ञांची मोठी टीम पूर्णवेळ उपलब्ध आहे. मुंबईच्या टाटा स्मारक केंद्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाने येथील सेवेवर रुग्णांचा विश्वास दृढ झाला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुचाकी चोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरीला

Next Post

मालपाणीज् बेकलाईटने आत्तापर्यंत २५ कोटी क्रीमरोल्स बनवून गाठला ऐतिहासिक टप्पा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
IMG 20241217 WA0084 1

मालपाणीज् बेकलाईटने आत्तापर्यंत २५ कोटी क्रीमरोल्स बनवून गाठला ऐतिहासिक टप्पा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011