नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कर्मयोगीनगर येथील रणभूमी ते भामरे मिसळ या सवाकोटी रुपयांच्या रस्ता कामाची निविदा काढण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या अडीच वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. महापालिकेचे आभार मानण्यात आले आहेत.
नाशिकच्या प्रभाग क्रमांक २४ मधील कर्मयोगीनगरमधील रणभूमी बॉक्स क्रिकेट मैदान ते खोडेनगर येथील भामरे मिसळ हा रस्ता विकसित करावा, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने सन २०२२ पासून करण्यात आली. निवेदनांद्वारे सतत पाठपुरावा करून, महापालिका आयुक्तांची भेट घेवून एक कोटी पंचवीस लाख रुपयांची आर्थिक तरतूद सन २०२३-२४च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या कामाचा प्रस्ताव, मंजुरी व निविदा काढण्यासाठी पाठपुरावा केला. अडीच वर्षांच्या प्रयत्नांना यश आले. शनिवार, दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी महापालिकेने या कामाची निविदा काढली. परमानंद अकॅडमीजवळ छोटा पूल व इतर कामे करून हा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यामुळे गोविंदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. बडदेनगर ते पाटीलनगर या रस्त्याला हा रस्ता जोडला जाणार आहे, याचा फायदा नव्या व जुन्या सिडकोसह शहरवासीयांना होणार आहे.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, बाळासाहेब राऊतराय, निलेश ठाकूर, विठ्ठलराव देवरे, संतोष कोठावळे, अशोक देवरे, दिलीप निकम, बापूराव पाटील, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, अनंत संगमनेरकर, आनंदा तिडके, शैलेश महाजन, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, दीपक दुट्टे, राहुल काळे, शिवाजी मेणे, सतीश मणिआर, सचिन राणे, हरिष काळे, प्रथमेश पाटील, पुरुषोत्तम शिरोडे यांच्यासह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहे.